A children's nursery rhyme about the modaks offered to Ganpati. The child describes the modak recipe and finally exhorts Ganesha to savor the treat and stay back for the rest of the 10 days of Ganeshotsav.
माडा माडा पाणी दे
पाणी घेउन नारळ दे
नारळ फोडून खोबरे घेतले
गुळ घालून पूरण केले
तांदुळाच्या पारीला काढले चिमटे
आत भरले पुर्णाचे वाटे
चिमटी मध्ये ओठ मिटले
मोदकाचे गाल फुगले
मोदकभाऊ मोदकभाऊ
गोड गोड तुझा खाऊ
गणपती बाप्पा मोदक खा
दहा दिवस इथेच रहा
Ganapati's Modak Song - Marathi Nursery Rhyme
Posted in Ganesha Songs,Ganpati Songs | | by Aparna
Subscribe to:
Post Comments (Atom)
गाणं छानच आहे. शिकण्यासारखं भरपूर आहे. याच्यावर हातवारे करून मुलांना मोदक कसे बनवले जातात याचं प्रात्याक्षिक करून दाखवता येईल. जर आई मोदक करत असताना हे गाणे म्हणेल, तर या गाण्याची मजा दुपपट येईल.
ReplyDelete