घरात बाळ म्हटल की अंगाई गाण आलाच. मग येत सो वा नसो, आई, आजी, पणजी सगळ्या जणी अंगाई गीते म्हणायला लागतात. काही शब्द येतात, काही नाही. कोणतेच अंगाई गीत नीट येत नसल्या मूळे माझी अमेरिकेत असलेली एक मैत्रीण तर हिंदी पिक्चरची गाणी म्हणायची!
निम्बोणीच्या झाडामागे
निम्बोणीच्या झाडामागे
चन्द्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही
गाय झोपली गोठ्यात
घरट्यात चिऊ ताई
परसत वेलीवर
झोपल्या ग जाई जुई
मीट पाकळ्या डोळ्यांच्या
गाते तुला मी अंगाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही
निम्बोणीच्या झाडामागे
चन्द्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही
देवकी नसे मीबाळा
भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी
केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता
जगावेगळी अंगाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही
निम्बोणीच्या झाडामागे
चन्द्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही
Note: If the Play button does not work, click on next song and the music will play.
Nimbonichya Zadamage Chandra Zhopala from the movie Bala Gau Kashi Angai is an eternal angai geet. From the time the movie released till date, this is one of the most popular of Marathi angai geete. Listen to the song here...
Note: If the Play button does not work, click on next song and the music will play.