ह्या अंगाई गीताचे बोल मला खुपच आवडतात. पटकन समजायला थोडीशी कठीण आहे, पण एकदा पाठ झाली की तुम्ही पण हीच गाल...
आली बघ गाई, गाई
शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध
घोटाळली ताटव्यात
आली बघ गाई, गाई
चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान
ऐकावया त्यांचा ताल
आली बघ गाई, गाई
लावी करांगुली गाली
म्हणून का हासलीस
उमटली गोड खळी
आली बघ गाई, गाई
लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले
डोळे माझ्या लाडकीचे
आली बघ गाई, गाई
काढीतसे लांब झोका
दमलीस खेळूनिया
झाक मोतियांच्या शिंपा
Lyrics of Marathi angai geet (lullaby) sung by Suman Kalyanpur
Showing posts with label Aali Bagh Gai Gai. Show all posts
Showing posts with label Aali Bagh Gai Gai. Show all posts
Aali Bagh Gai Gai - Marathi Angai Geet
Posted in Aali Bagh Gai Gai,Angai Geet | | by Aparna
Subscribe to:
Posts (Atom)