I hope all my Marathi speaking friends enjoy this blog. I'll try to make it the best resource for the best nursery rhymes, children's songs complete with videos and lyrics in Marathi.
RSS

Nimbonichya Zadamage Song Lyrics - Marathi Angai Geet


घरात बाळ म्हटल की अंगाई गाण आलाच. मग येत सो वा नसो, आई, आजी, पणजी सगळ्या जणी अंगाई गीते म्हणायला लागतात. काही शब्द येतात, काही नाही. कोणतेच अंगाई गीत नीट येत नसल्या मूळे माझी अमेरिकेत असलेली एक मैत्रीण तर हिंदी पिक्चरची गाणी म्हणायची!


निम्बोणीच्या झाडामागे
चन्द्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला   
झोप का ग येत नाही 

गाय  झोपली गोठ्यात 
घरट्यात चिऊ ताई
परसत वेलीवर 
झोपल्या ग जाई  जुई

मीट  पाकळ्या  डोळ्यांच्या 
गाते  तुला  मी  अंगाई 
आज माझ्या पाडसाला   
झोप का ग येत नाही 

निम्बोणीच्या झाडामागे
चन्द्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला   
झोप का ग येत नाही 

देवकी नसे मीबाळा
भाग्य यशोदेचे भाळी

तुझे दुःख घेण्यासाठी 
केली पदराची झोळी 
जगावेगळी  ही ममता 
जगावेगळी अंगाई
आज माझ्या पाडसाला   
झोप का ग येत नाही 

निम्बोणीच्या झाडामागे
चन्द्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला   
झोप का ग येत नाही 

Nimbonichya Zadamage Chandra Zhopala from the movie Bala Gau Kashi Angai is an eternal angai geet. From the time the movie released till date, this is one of the most popular of Marathi angai geete. Listen to the song here...



Note: If the Play button does not work, click on next song and the music will play.

9 comments:

  1. अपर्णाबाई आचरेकर : 'निंबोणीच्या झाडामागे' हे बालगीत करण्याची इच्छा मनात बाळगून केलेलं, पण प्रत्यक्षात लहान मुलांचा संदर्भ असलेलं मोठ्यांचं गाणं आहे. हे बालगीत नाही, अंगाईगीतही नाही. अगदी लहान मुलासाठी फक्त पुनरावृत्ती आणि लयताल असलेले शब्द हवेत, अर्थ असो वा नसो. 'अडगुलं मडगुलं' वगैरे. काही वर्षांनंतरही 'मामाच्या गावाला ज़ाऊ या' असलं काव्यगुण वगैरेच्या भानगडीत न पडणारं गाणं असतं. मुलांना उपमा, उत्प्रेक्षा वगैरे नकोत. अनुप्रासही 'कविसा रविसा स्मरारि सायकसा' वगैरे नको. तो 'झुक झुक झुक झुक अगीन गाडी' असला हवा. बालकवींनी 'ऊठ मुला, ऊठ मुला' मधे लिहिलेल्या काही ज़ड ओळी दुसरीच्या पुस्तकांत न घेण्याचा योग्य निर्णय एके काळी घेतला होता.
    'तुझे दुःख घेण्यासाठी
    केली पदराची झोळी'
    किंवा
    देवकीचे कडूगोड दु:ख, गोडकडू सुख, यशोदेचे मिश्र प्राक्तन या भानगडीत दहा वर्षाच्या मुलांना पण क्वचितच रस असतो. सहा महिन्याच्या किंवा सहा वर्षांच्याही मुलांसाठी हा मज़कूरच नाही, आणि बालगीताला आवश्यक नादही त्यात नाही. तशीही बरीचशी प्रसिद्‌ध अंगाईगीतं की मुलांच्या झोपेशी संबंधित मज़कूर पण सांगितिकदृष्ट्या प्रगल्भ ज़ाणिव आवश्यक असलेली आहेत, आणि सुराची काळजी करत 'धीरे से आजा री अखियन में' म्हणण्यापेक्षा 'गाई गाई' करत मुलाला हाणत राहिलं की त्याचा उपयोग होतो.

    या ब्लॉगमागची कल्पना छान आहे, आणि ब्लॉगही तसाच खूप छान आहे. हज़ाराहून ज़ास्त ब्लॉगलेखकांत तुम्हालाच ही कल्पना सुचली, आणि तन्निमित्ते पन्नासाहून ज़ास्त गाणीही यात आलीत. तुमची कमाल आहे.

    ReplyDelete
  2. Thank you for your comment. But the intention behind posting this song was never to label it as a children's song. I understand that most of the words and sentiments expressed in this beautiful composition are very difficult for children to understand.
    I have noticed over the last few days that many visitors come to my blog searching for angai geet. They leave comments saying that they want lyrics. I thought that this post will help all. Thanks again.

    ReplyDelete
    Replies
    1. Hi one small correction in this song.
      In first stanza it should be parasaat ( meaning backyard) and not parsat velivar jhoplya ga jai jui. The word parasat has no meaning.

      Delete
  3. i want 2 download dis mp3 song..pls help me

    ReplyDelete
  4. who is the music director of this song?????????
    reply at the earliest....

    ReplyDelete
  5. Thanks for posting this angai song.

    ReplyDelete
  6. nice song my mother always sings this song...i love the words n feelings behind this..my childhood memories also connected with this song

    ReplyDelete
  7. Music director is Madhusudan kalerkar

    ReplyDelete

 
Kontera Content Link