एटू लोकांचा देश
तिबेटाच्या जरा खाली
हिमालयाच्या जरा वर!
एटू लोकांचा अद्भूत देश
प्रत्येकाजवळ उडते घर!
'टींग' म्हणता येते खाली
'टंग' म्हणता जाते वर!
मागे एकदा काय झाले
एटूंवर चिनी चालून आले!
पण एटूंचीच झाली सर
सगळी घरे गेली वर!
चिनी म्हणाले पळाला राजा
तोच टींग म्हणून वाजला बाजा!
डोक्यावर घातली घरांनी झडप
सगळे चिनी झाले गडप!
- विंदा करंदीकर
Showing posts with label Etu Lokancha Desh. Show all posts
Showing posts with label Etu Lokancha Desh. Show all posts
Etu Lokancha Desh - Vinda Karandikar Marathi Kavita
Posted in Etu Lokancha Desh,Vinda Karandikar Kavita | | by Aparna
Subscribe to:
Posts (Atom)