Short Marathi Kavita / Poems

गर्वाचे घर
एकदा एक चांगला पत्त्यांचा बंगला
उगीचच आपल्या गर्वाने फुगला
तिकडून वार्‍याने वाजवली टाळी
आणि गर्वाचे घर आले खाली!
- वृंदा लिमये 


मात
साखर लिंबू साखर पोहे
साखर भात 
या सर्वांवर साखर झोप 
करते मात! 
- सदानंद रेगे

No comments:

Post a Comment