मी जर झालो
मी जर झालो एक दिवस राजा
सारेजण हुकुम मानतील माझा
सर्वांना माझा एवढा वाटेल धाक
ऐकतील निमूट मुठीत धरून नाक!
आईला म्हणेन, जेवण नको वाढू
उघड सारे दबे, काढ चिवडा-लाडू!
ताईला म्हणेन, आरशात नको पाहू
उटसूट सिनेमातली गाणी नको गाऊ!
दादाला म्हणेन, घोळवीत शीळ
मिशीला उगीच भारू नको पीळ!
बाबांना म्हणेन, बाजारात जाउन
माझ्यासाठी छानसा स्कूटर या घेउन!
मुलांना म्हणेन तुम्ही पतंग उडवा
गुरूजींना म्हणेन, तुम्ही गणित सोडवा!
मी जर झालो एक दिवस राजा
खरे सांग बारे, किती येइल मजा!
- शांता शेळके
अतिशय छान बालगीत....... बरेच दिवस झाले मुलीला म्हणून दाखवण्यासारखे गाणे मिळाले नव्हते. हे तिला नक्कीच आवडेल.
ReplyDeleteatishay sundar !
ReplyDeleteinteresting to know that Vinda Karandikar(if it is he)writing children poems, I am too keen to know about marathi children literature, but rarely found now only some blog on children poems, I am also writer for children writer, doing studies in children lit also, if interested I will send news letter on children lit sean in Karnataka - Anand Patil
ReplyDeletehi Aparna
ReplyDeletei m new follower of your blog
u r really doing a great job for new moms like me
thank keep doing
मराठी अंगाई गीत
ReplyDelete