एक छोटी पण सुंदर कविता, दोन तीन वेला ऐकूनच मुलांना पाठ होइल. दत्त बाप्पा पासून सुरुवात होते आणि गणपती बाप्पा वर संपते!
दत्त दत्त
दत्ताची गाई
गाईच दूध
दुधाच दही
दह्याच ताक
ताकावरच लोणी
लोण्याच तूप
तुपाचा डेरा
डेऱ्याची माती
मातीचा गणपती
गणपतीची घंटा
घण घण घण
ही कविता लहानपणी ऐकली होती. मध्यंतरी विस्मरणात गेली होती. काही वर्षांपूर्वी माझ्या भाचीला शिकवताना लक्षात आलं की ही कविता आपल्याला व्यवस्थित पाठ आहे.
ReplyDeleteHi kavita lahanpanichi athavan karun dete...
ReplyDelete