हाले हा नंदाघरी पालणा
त्यात देखणा, गोजिरवाणा, हसतो गोकुळ राणा
ओठ लाल ते, डोळे चिमणे, हास्यातून त्या फुले चांदणे
स्वरुप सुंदर लोभसवाणे, मोहून घेई मना
बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते वेदाचे
रुणझूणताती घुंगुरवाळे, येई धेनूना पान्हा
नंद यशोदा करीती कौतूक, आनंदाचे अमाप ते सुख
मायपित्याविण कसे कळावे, सौख्य तयाचे कुणा
Women sing in praise of the newborn comparing the infant to Lord Krishna on the occasion of his naming ceremony in this Marathi song.
No comments:
Post a Comment